पेट्रोल-डिझेलवरील करकपातीबाबत चर्चासुद्धा नाही!

29 Apr 2022 16:31:06
bt
 
 
मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’मध्ये कपात करून जनतेला इंधन दरदिलासा देण्याचे आवाहन केले होते.त्यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’मध्ये घट करण्याचा निर्णय घेईल, अशी चर्चा सुरु झाली होती. पण, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यात इंधनावरील ‘व्हॅट’मध्ये कपात करण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मोदींनीराज्यांवर केलेल्या या टीकेनंतर राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या ‘व्हॅट’मध्ये कपात करता येते का, याची चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा होती. पण ही नुसतीच चर्चाच राहिल्याचे बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या कबुलीनंतर स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0