"२००० कोटींची बॅंक गिळंकृत करण्याचा 'पवारांचा डाव?"

28 Apr 2022 16:44:56

gopichand
 
 
 
मुंबई: "सहा महिने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची बँक असलेल्या एसटी बँक आणि तिची २००० कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आखला आहे" असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या बँकेच्या सध्या निवडणूक होणार आहेत, या निवडणुकांसाठी जे या बँकेचे थकबाकीदार आहेत त्यांना मदत करता येणार नाही असा आदेश काढण्यात आला आहे. आता हा थकबाकीदार आपल्या हक्कांची लढाई लढणारा एसटी कर्मचारी हाच आहे हे उघड आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा शरद पवारांचा डाव आहे असा आरोप पाडळकरांनी केला आहे.
 
 
"१९९५ साली आपल्या संघटनेलाच बँकेची अधिकृत संघटना म्हणून पवरांनी मान्यता मिळवून घेतली, बँकेच्या वर्गणीसाठी म्हणून कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले, त्यातून १०० कोटी रुपये लाटले आणि संपूर्ण बँकच घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे तो आम्ही हाणून पाडू" असा इशारा पडलकरणनी पवारांना दिला आहे. शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे नेते आहेत पण या सहा महिन्यांच्या संपाच्या काळात पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांची साधी विचारपूससुद्धा केली नाही हीच पवारांची माणुसकी आहे का? असा सवाल पडळकरांनी केला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0