राज्याने कर वाढवला हा आरोप चुकीचा- अजित पवार

28 Apr 2022 15:40:17

pawar
 
 
 
 
मुंबई: "महाराष्ट्र सरकारने कुठलाही कर वाढवला नसून, उलट गॅस वरील कर साडेतेरा टक्क्यांवरूनतीन टक्क्यांवर आणला आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत हे वक्तव्य निराधार आहे" असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जीएसटी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांनी कर वाढवले असल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत तेव्हा राज्यांनी आपले कर कमी करावेत असे आवाहन मोदींनी त्या बैठकीत केले होते त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
 
 
 
"महाराष्ट्र आणि मुंबई मधून सर्वात जास्त कर गोळा केला जातो हे खरे आहे, कारण महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर जातो. जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर, जीएसटी, एक्ससाईज, रेव्हेन्यू हीच राज्याची उत्पन्नाची साधने आहेत" असे पवार म्हणाले. राज्याला जीएसटी थकबाकीची रक्कम येणे बाकी असून लवकरच ती केंद्राकडून मिळेल असेही ते म्हणाले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0