कराची विद्यापीठात झालेल्या बॉम्बस्फोटात ३ चिनी नागरिक ठार

    दिनांक  26-Apr-2022 17:58:14
|
 
 
 

Karachi, Pakistan
 
 
 
 
 
 
 कराची: पाकिस्तान चा कराची विद्यापीठाचा आवारात एका व्हॅनमध्ये झालेला स्फोट मध्ये एकूण ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ चीनी महिला असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांकढून करण्यात आली आहे. चीनी भाषा शिक्षणाचे केंद्र असलेल्या कॉंफुसिस इन्स्टिटयूटच्या आवारात असलेल्या एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला झाला.
 
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , स्फोटात ठार झालेल्या ३ महिला चीनी नागरिक होत्या व त्या स्फोटाचे मुख्य लक्ष्य असू शकतात. स्फोटातील मृतांमध्ये आणखी दोन व्यक्तींचा समावेश असून ते घटनास्थळी असलेले वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक होते. या मृतांशिवाय ३ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
 
 
 
या घटनेबाबत बरेच परस्परविरोधी बातम्या समोर आले, पण वरिष्ठ पोलीस अधिकारी मुक्कादास हैदर यांनी दिलेल्या तपशिलानुसार, प्राथमिक तपास केला जात आहे आणि ते व्हॅनच्या आत किंवा जवळ लावलेले रिमोट कंट्रोल्ड स्फोटकांचा शोध लावत आहेत. उर्दू भाषेतील 'जेंग' वृत्तपत्रानुसार, स्फोट झाला तेव्हा व्हॅन कराची विद्यापीठातील आयबीए संस्थेत चिनी भाषा शिकवत असलेल्या दोन परदेशी नागरिकांना त्यांच्या गेस्टहाऊसमधून आणत होती.
 
 
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पाकिस्तान मधील सर्वात श्रीमंत शहर असलेल्या कराची शहरात चिनी नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे यातून समोर आले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.