सोमय्या हल्ला प्रकरणात सामील, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

25 Apr 2022 17:34:23
 

mahadeshwar 
 
 
 
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या राणा दांपत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्थानकात गेले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी असलेल्या शिवसैनिकांमध्ये महाडेश्वरही सामील होते.
 
 
यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. महाडेश्वर यांनी उलट असा आरोप केला होता की सोमय्या यांनीच पहिले शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप महाडेश्वर यांनी केला होता.
 
 
खार पोलीस स्टेशन बाहेर शिवसैनिकांना माझ्यावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सोमय्या हेसुद्धा जखमी झाले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0