रवी राणा - नवनीत राणा यांना पोलिसांकडून नोटीस

22 Apr 2022 14:32:30
 
 
navneet
 
 
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा या दोघांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कलम १४९ अन्वये ही नोटीस बजावली गेली आहे. राणा दांपत्याच्या खार मधील निवासस्थानी जाऊन पोलिसांनी ही नोटीस दिली. या नोटिशीचे उल्लंघन केल्यास राणा दांपत्यावर कारवाई होऊ शकते असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान नवनीत राणा मुंबईत दाखल झाल्याची बातमी कळताच मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे नेतेही मातोश्री बाहेर ठाण मांडून बसले आहेत. शिवसैनिकांची ही फळी भेदून नवनीत राणा जाऊ शकतील का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0