नवाब मलिकांवर ईडीचे ५ हजार पानांचे आरोपपत्र

22 Apr 2022 12:24:30
 
Nawab Malik
 
 
 
 
 
मुंबई: दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गुरुवारी ईडी कडून आरोप पत्र दाखल केले गेले. तब्ब्ल ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्या मुंबईतील मालमत्ता खरेदी प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए) ने हसीना पारकरच्या मुंबईतील मालमत्तांवर टाकलेल्या धाडींमध्ये या प्रकरणाचे पुरावे मिळले होते.
 
 
 
 
" या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक हेच प्रमुख लाभार्थी होते आणि मुंबईतील या मालमत्तांचा ताबा मिळवण्यासाठी त्यांनी दाऊदच्या टोळीतील एका प्रमुख व्यक्तीला पैसे दिले होते" असा आरोप मलिक यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून ठेवण्यात आला आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0