शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी!

22 Apr 2022 19:37:13

mitkari




मुंबई :
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवित्र हिंदू धर्माची, परंपरेची, संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली. या प्रकरणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्र अध्यात्म आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनीही राऊतांविरोधात जहरी टीका केली आहे. राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी, असे म्हणत त्यांच्यावर ही टीका केली आहे.



ते म्हणाले, "हिंदु धर्माची चेष्टा करणारे हे दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी आहे. तर त्यावर निर्लज्जपणे दात काढणारे धर्म बुडवे मंत्री जयंत पाटील आणि 3-4 बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे होते. हिंदूंची खिल्ली उडवणारे हे बांडगुळ पावसाळ्या आधीच उगवायला लागलेत. तेव्हा समस्त हिंदूं समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.", असा घणाघात त्यांनी केला.



Powered By Sangraha 9.0