‘आयएनएस दिल्ली’वरून डागलेल्या ‘ब्रह्मोस’ने केला यशस्वी लक्ष्यभेद

21 Apr 2022 17:58:51
 
bramhos

 
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): भारतीय नौदलाने मंगळवारी ‘आयएनएस दिल्ली’ या युद्धनौकेवरून लांब पल्ल्याच्या ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रात्यक्षिक केले. यावेळी क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला.
 
‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राने मंगळवारी आणखी एक टप्पा पार केला. ‘ब्रह्मोस’ने एकाच लक्ष्यावर दोन यशस्वी हल्ले केले. यामध्ये एका जहाजाला लक्ष्य करण्यात आले. पहिली चाचणी भारतीय नौदलाच्या युद्धनौका ‘आयएनएस दिल्ली’ने देशाच्या पूर्व समुद्रकिनारी घेतली. ‘ब्रह्मोस’च्या अधिकार्‍यांनी वॉरहेड नसलेल्या क्षेपणास्त्राने जहाजात मोठे भगदाड पाडले. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र सुमारे तीन हजार किमी प्रतितास वेगाने लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम असून, जगातील कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेस या क्षेपणास्त्रास रोखणे जवळपास अशक्य आहे.
 
दरम्यान, ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आणि युद्धनौका ‘आयएनएस दिल्ली’ची निर्मिती देशातच झाली आहे. यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांमध्ये भारतीय नौदलाच्या योगदानाला बळकटी मिळाली आहे. या यशामुळे आवश्यकतेनुसार दूरस्थ हल्ले आणि समुद्रातून जमिनीवर हल्ले करण्याची भारतीय नौदलाची क्षमता वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0