लेखक दीपक करंजीकर यांच्या २ पुस्तकांचे शुक्रवारी प्रकाशन

खा. विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती

    दिनांक  20-Apr-2022 13:31:01
|
 
deepak
 
 
ठाणे : प्रसिद्ध लेखक, व्याख्याते तथा अभिनेते दीपक करंजीकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, दि.२२ एप्रिल रोजी नौपाडा भागातील सहयोग मंदिर सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
 
 
‘दीनदयाळ प्रेरणा केंद्र’ आणि ‘परम मित्र पब्लिकेशन्स’ आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्यासह ‘थहे झरळपींशव चू चेपशू थहळींश’ या बहुचर्चित इंग्रजी पुस्तकाचे लेखक व अर्थतज्ज्ञ श्री अय्यर उपस्थित राहाणार आहेत.
 
 
‘विघ्न विराम’ हे पुस्तक ‘थहे झरळपींशव चू चेपशू थहळींश’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. तसेच, ‘अस्वस्थ सूत्र’ या पुस्तकातून अफगाणिस्तानचा इतिहास, तालिबान काळ, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील आक्रमण, सद्यःस्थिती आणि त्याच्याशी जोडलेले आंतरराष्ट्रीय कूट नीतिचे ताणेबाणे याचा वेध घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला वाचक, पुस्तक प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, ‘परम मित्र पब्लिकेशन्स’चे माधव जोशी, सुजय पतकी यांनी केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.