"...तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते."

20 Apr 2022 20:22:43

Raju Patil Dhananjay Munde
 
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या संवाद यात्रेत आमदार धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपचा बोलका भाऊला अर्धवटराव म्हणून संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्वीट करत बुधवारी (दि. २० एप्रिल) धनंजय मुंडेंवर चांगलाच पलटवार केला. "तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते.", असे राजू पाटील यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा यांचा अप्रत्यक्षपणे यात उल्लेख केल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
"धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते.", असे राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0