जीएसटी कररचनेत मोठ्या बदलांची शक्यता

17 Apr 2022 15:38:09

gst 
 
 
नवी दिल्ली:  मे महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत कररचनेत मोठ्या बदलांची शक्यता नोंदवली जात आहे. सध्या असलेल्या ५, १२, १८, २८ टक्क्यांच्या सध्याच्या कररचनेत बदल होणार असल्याचे संकेत आहेत. ५ टक्के कराचा टप्पा हटवला जाणार असून त्या मधील वस्तूंचा ३ आणि ८ टक्क्यांच्या वस्तूंमध्ये समावेश केला जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक होणार असून त्यात हे निर्णय होण्याची शक्यता आहे. या टप्प्यांमध्ये ८ टक्के कराचा नवीन टप्पा लागू केला जाणार असून, ३ टक्के करांमध्ये आधी सोने आणि दागिने या वस्तूंचा समावेश होत होता.
 
 
सध्याच्या ५ टक्के करात १ टक्क्याची वाढ जरी केली तरी ५० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे आत या वस्तूंवर ८ टक्के कर आकाराला जाण्याची शक्यता आहे. या वस्तूंमध्ये पाकिटबंद खाद्य पदार्थांचा समावेश होतो. जीएसटी कररचना अधिक सुसंगत करणे, त्यामधल्या विसंगती दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून महसूल वाढीसाठी काय करता येईल याचीही चर्चा या परिषदेत होणार आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0