डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये त्यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टीमेटम दिले. तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर कल्याणात कल्याण शहर मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदीरात महा आरती आणि हनुमानचालीसा पठण करण्यात आले. यावेळी जय श्रीराम , जय हनुमानची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर तुमच्याने कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर एक दिवस कायदा आमच्या हातात द्या, राज्य सरकारने ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरल्यास आम्ही मशिदीबाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू , सरकारने विसरू नये की टायगर अभी जिंदा है असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला