आलियाच्या लग्नात महेश भट्टने केला सप्तपदीला विरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2022
Total Views |
 
 
आलिया
 
 
 
 
मुंबई : बॉलीवुड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह बंधनात अडकलेत. सर्व कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण याच वेळी त्यांच्या लग्नातील ‘सप्तपदीं’विषयी अनेक विरोधाभासी गोष्टी आढळल्याची चर्चा आहे.
 
 
 
 
आलियाच्या भावाने सांगितले की, "त्यांनी भटजींसमोर फक्त चारच फेरे घेतले. महेश भट्ट यांनी आलियाला सातवे वचन देण्यापासून रोखले. भट त्यावेळी म्हणाले की, ‘आम्ही अशा कुटुंबातले आहोत ज्यात अनेक धर्माचे आणि संस्कृतीचे लोक राहतात. त्यामुळे मला प्रत्येक धर्माची पूर्ण अशी माहिती नाही. फेरे आणि ह्या सर्व प्रथा माझ्यासाठी खूप उत्सुकता निर्माण करणाऱ्या होत्या.’याच बरोबर इतर सूत्रांकडून कळले की रणबीर आणि आलिया ने लग्नात सात ऐवजी सहाच फेरे घेतले. आलियाचे वडील महेश भट्ट यांनी तिला शेवटचे सातवे वचन देण्यापासून अडवले. त्यांचे म्हणणे होते, ‘मी देखील माझ्या लग्नात माझ्या पत्नीकडून हे वचन घेतले नाही तर माझ्या मुलीला कशी परवानगी देऊ.’
 
 
 
लग्नाच्या आधी असे सांगण्यात आले होते की ही जोडी हिंदू परंपरेनुसारच लग्न करणार आहे. परंतु ‘कन्यादान’ या प्रथेला एका जाहिरातीत आलियाने ही प्रथा म्हणजे मला मागासलेले विचार वाटतात, असं म्हटलं होतं. आलिया भट्टच्या वडिलांची आई शिरीन मोहोम्मद अली मुस्लिम होत्या, तर त्यांचे वडील नानाभाई भट्ट गुजराती ब्राह्मण होते. त्यामुळे महेश भट्ट मुस्लिम आणि गुजराती दोन्ही होते. त्याचबरोबर आलियाची आई सोनी राजदान काश्मिरी हिंदू आणि इसाई धर्माची होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@