मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच कोल्हापुरात झळकले जाधवांच्या अभिनंदनाचे बॅनर

16 Apr 2022 10:55:12
 
 
jadhav
 
 
कोल्हापूर : आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत. मात्र मतमोजणी सुरू असतानाच श्रीमती जाधव यांचे अभिनंदन करणारे फलक कसबा बावडा परिसरात झळकावण्यात आले आहेत.
 
कसबा बावडा हा पालकमंत्री सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असून याच भागातून श्रीमती जाधव यांनी पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर घेतली आहेत. या भागातून एकूण २२ हजार मतदान झाले असून यापैकी जयश्री जाधव यांनी १५ हजारांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. अजून १९ फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी असतानाच बावड्यात मात्र श्रीमती जाधव यांच्या अभिनंदनाचे फलक झळकावण्यात आले आहेत.
 
आजपासून बावड्यातील जत्रा सुरू झाली असून या जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी उभारलेल्या फलकावरच श्रीमती जाधव यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा मजकूर आहे. या फलकावर पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह त्यांचे बंधू डॉ. संजय डी. पाटील, पुतणे आमदार ऋतुराज आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे फोटोही लावण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0