कोल्हापूरात हवा कुणाची?

16 Apr 2022 11:16:03

satyajeet

 
 
 
कोल्हापूर  : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर ही पोटनिवडणूक झाली.


या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु असून बाराव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना ५०७९७ मते मिळाली असून भाजपच्या सत्यजित कदमांना ३९६६८ मते मिळाली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव सुमारे ११, १२९ मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून हा निकाल राजकीय पक्षांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, आगामी महानगरपालिका निवडणुकांत या निवडणुकीचा परिणाम दिसण्याची दाट शक्यता आहे.
 
 
 
 
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून एकूण २६ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सरनोबतवाडी इथल्या शासकीय गोदामात ही प्रक्रिया पार पडत असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली.
 
 

 
Powered By Sangraha 9.0