भाजप करणार मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यांची पोलखोल! लवकरच...

    16-Apr-2022
Total Views |
 
bjp
 
 
 
 
 
मुंबई: मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या सर्व घोटाळ्यांची मुंबई भाजपकडून पोलखोल करण्यात येणार आहे. ४० हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प असूनही मुंबई शहराची अवस्था दयनीय कशी? मुंबईकरांचा पैसा गेला कुठे? या सर्व घोटाळ्यांना भाजप वाचा फोडणार आहे. मुंबईत असलेली सुविधांची वानवा, रस्त्यांवरचे खड्डे, नालेसफाई, वाहतूक समस्या या सर्व समस्या मुंबई भाजप या पोलखोलच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहे.