मुंबई: "बाबासाहेबांच्या विचार खूप मोठे आहेत आणि त्यांच्या विचारांवरच, त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारेच देश चालला पाहिजे अशा शब्दांत भावना व्यक्त करून मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१व्य जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे अध्यक्ष शरद कांबळे, सरचिटणीस राहुल कांबळे तसेच मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.