‘वरवर’ नाही; ‘कायम’चा इलाज!

14 Apr 2022 12:58:57

VR
 
 
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): संशयित नक्षलवादी आणि कथित कवी, सामाजिक कार्यकर्ता वरवरा राव याचा कायमस्वरूपी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्याचप्रमाणे राव यास मुंबई सोडून जाण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.
 
 
संशयित नक्षलवादी वरवरा राव याने मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरुपी जामीन मिळावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राव याचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्याचवेळी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला असून यापूर्वीच्या आदेशास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, तात्पुरत्या जामिनास मुदतवाढ केवळ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देण्यात येत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
 
 
जामिनाच्या कालावधीमध्ये तेलंगणमधील हैदराबाद येथे राहण्याची परवानगी द्यावी, अशीही विनंती राव याच्यातर्फे करण्यात आली होती. त्यासाठी मुंबईमधील वास्तव्य आणि खर्च परवडत नसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने राव याचा तोदेखील अर्ज फेटाळून लावला आहे.
Powered By Sangraha 9.0