"मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांचे 'सीडीआर' तपासल्यास अनेक गोष्टी बाहेर येतील"

12 Apr 2022 14:38:25

Pravin Darekar
 
 
 
मुंबई : "पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, सीएमओ, पोलीस आयुक्त संजय पांडे हे सर्वजण स्वतः मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात जातीने लक्ष घालत होते. जर आपण सगळ्याचे सीडीआर तपासले, तर त्यातून अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात.", अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणाबाबत दरेकर यांना मंगळवारी (दि. १२ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला. त्यावेळी घडलेल्या एकूण प्रकाराबद्दल आणि मविआकडून रचल्या जाणाऱ्या कारस्थानाबद्दल ते माध्यमांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी ठाकरे सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याचेही दरेकर यांनी म्हटले होते. मात्र न्यायालयाने दरेकरांना दिलासा दिल्याने विरोधकांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
"पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, सीएमओ, पोलीस आयुक्त संजय पांडे हे सर्वजण स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घालत होते. जर आपण सगळ्याचे सीडीआर तपासले, तर त्यातून अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. ज्या गोष्टीत तथ्यच नव्हतं, त्या गोष्टीला जोर जबरदस्तीने कलमं लावून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न मविआ सरकारकडून केला जात होता. मविआ सरकारचा वारंवार यात हस्तक्षेप होताना दिसत होता. त्यांनी मला अडकवण्याचा एक प्रकारे अजेंडाच रचला होता. मात्र आज न्यायालयाने जो निकाल दिला त्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.", असेही दरेकर पुढे म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0