कोलकाता: शारिक अहमद या तरुणाने एका हिंदू युवतीला इंडिगो एअरलाईन्स मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या प्रलोभनाने बलात्कार करून तिला लुटल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हमीदने फेसबुकच्या माध्यमातून या तरुणीशी संपर्क साधला होता. कोलकात्यात एका गेस्ट हाऊसवर या तरुणीस बोलावून तिच्यावर त्याने अत्याचार केले. त्याला जमशेदपूर येथून अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोलकात्यातील बारा बझार पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक एस. पाल यांनी दिली आहे.
पीडितेने याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ एप्रिल रोजी हमीदने या तरुणीवर अत्याचार करून तिच्याकडचे २.५ लाख रुपयांचे दागिनेही चोरले होते. तो इंडिगो एअरलाईन्सचा मध्ये नोकरी करत असल्याचा कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. पोलिसांनी जेव्हा गेस्ट हाउस आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हमीद दागिन्यांसह कैद झाला होता यावरून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला जमशेदपूर येथे अटक केली.