अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदावर्तेंना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर गुणरत्न सदावर्ते यांना यांच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ न्यायालयाने केली आहे. सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पूर्वी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या पोलीस कोठडीत आता न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबर इतर १०९ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.