मुंबई : राज्य सरकारने करोनाबाबतचे सर्व निर्बंध ३१ मार्च रोजी हटवले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत गुढीपाडवा मंडळांनी स्वागत केले आहे. मात्र गुढीपाडवा एक दिवसांवर येऊन ठेपला असताना शोभायात्रा मिरवणुकीची तयारी करायची कशी, अशा पेच अनेक आयोजक मंडळांसमोर ठेपला आहे. ‘यावर्षी कोरोना नियंत्रणात होता. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना राज्य सरकार परवानगी देईल, अशी आशा होती. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून याबाबत स्थानिक पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला असता, त्यांनी गुढीपाडवा शोभायात्रांबाबत राज्य सरकारकडून काहीही निर्देश नाहीत, उलट मुंबईत जमावबंदीचे आदेश आहेत, असे ‘मंदार निकेतन उत्सव मंडळा’च्या भायखळ्याच्या गुढीपाडवा’चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना सांगितले.
‘मंदार मंडळ’ कित्येक वर्षे भायखळा विभागात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा मिरवणूक काढत होते, परंतु गेली दोन वर्षे कोरोनामुळे गुढीपाडवा शोभायात्रा मिरवणूक काढता आली नाही. गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला आहे आणि राज्य सरकार आयत्यावेळी गुढीपाडवा शोभायात्रा मिरवणुकीला आता परवानगी देत आहे. शोभायात्रा मिरवणूक आयोजक मंडळांनी एका दिवसात मिरवणुकीची तयारी करायची कशी, असा प्रश्न आयोजक मंडळांपुढे ‘आ वासून उभा आहे. राज्य सरकारला निर्णय घ्यायचा होता तर तो किमान चार/पाच दिवस आधी जाहिर करायला हवा होता, असे अनेक मंडळांच्या पदाधिका-यांचे स्पष्ट मत आहे.