जम्मू-काश्मीरमध्ये मक्यासह तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी ‘पार्क’ सक्रिय

09 Mar 2022 12:12:26
          
parc
 
 
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये मक्याच्या उत्पादनासह तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ने (पार्क) पुढाकार घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांतील विविध जिल्ह्यांमध्ये मक्याचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. मात्र, मक्याचे उत्पादन वाढविणे आणि मक्याची निर्यात व अन्य उत्पादनांची निर्मिती करणे यासाठी पार्कने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अमेरिकेतील ‘गॉरमेट पॉपकॉर्निका’ या ‘पॉपकॉर्न’ निर्मिती कंपनीची मदत घेण्यात आली आहे. प्रदेशातील दोन्ही विभागांतील जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 25 एकर जमिनीवर पांढरा आणि पिवळा मका व ‘स्वीटकॉर्न’चे उत्पादन वाढविण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ चालविण्यात येणार आहे. मक्यासह प्रदेशात तेलबियांचेही उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
 
 
यासाठी ‘पार्क’ जम्मू-काश्मीरच्या प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे काम करीत आहे. त्याविषयीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस ‘पार्क’च्या ‘नेटवर्क डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक अलायन्स हेड’ रुचिता राणेे, कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण विभागाचे प्रधान सचिव नवीन कुमार चौधरी, ‘गॉरमेट पॉपकॉर्निका’चे वेंकटेश्वर बाबू, युगंधर यानमादला आणि एस. बी. पी. पट्टाभीरामाराव उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0