मुंबई: मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांनी महिलादिनापासून आझाद मैदानात धरणे आंदोलन पुकारले आहे.किमान वेतन, भविष्य निर्वाहनिधी, घरभाडे भत्ता यांसारख्या मूलभूत मागण्याही पूर्ण न झाल्याने आरोग्यसेविकांवर ही वेळ आली आहे. पालिकेकडून कोविड काळात जीवावरचे संकट पत्करून जनतेची सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांवर होणार अन्याय पुन्हा एकदा उघड झळा आहे.
पालिकेकडून नियुक्त केलेल्या या चार हजार आरोग्यसेविका घरोघरी जाऊन बालकांचे लसीकरण करणे, संसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधणे, प्लस पोलिओ लसीकरण यांसारखी अनेक महत्वाची कामे करत असतात. कोरोना काळातही राज्य शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेतही या आरोग्यसेविकांनी योगदान दिले आहे. तरीही यांच्याकडे पालिकेकडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे ट्रस्ट होऊन या आरोग्य सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. जर मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. "पालिका वेतनबाबाबत खटले दाखल करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते पण कोविड काळात धोका पटकावून सेवा बजावलेल्या आरोग्यसेवकांकडे दुर्लक्ष करते, त्यांना किमान वेतनासारख्या मूलभूत गोष्टींपासून वंचित ठेवले जाते. अशी संतापजनक प्रतिक्रिया महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली आहे.