टीम आदित्य ठाकरे आयकर रडारवर?

08 Mar 2022 12:35:16
aaditya thackre

मुंबई : आज सकाळी ५ वा. आयकर विभाग विविध ५ ठिकाणी धाडी टाकत आहे.यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींवर धाडी टाकल्या जात आहे.यात एक नाव समोर येत आहे ते म्हणजे संजय कदम. परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे.


aaditya thackre
 
 
 संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. आज त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यातच आज सकाळपासूनच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्याही घरी आयकर विभागाची धाड पडली आहे. एकाच दिवसांत शिवसेना या पक्षाच्या जवळच्या नेत्यांवर धाडी पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

यावर टिप्पणी करताना नितेश राणे म्हणतात की, रात्रीच्या आयुष्याचे समर्थन करणाऱ्या टीमला आता रात्रीच्या झोपेचाही अभाव असेल. आदित्य ठाकरेंच्या 'नाईट लाईफ' च्या कल्पनेवर टिप्पणी करताना नितेश राणे यांनी संजय कदम आणि राहुल कनाल यांच्यावर धाडी टाकल्यानंतर टीका केली आहे.




 
 
Powered By Sangraha 9.0