'चित्रमैत्रेयास' लावली अनेक मान्यवरांची उपस्थिती

31 Mar 2022 11:43:50
 

tarangan 
 
 
मुंबई : सुमन दाभोलकर यांचे 'चित्र मैत्रेय' हे प्रदर्शन २९ मार्च पासून नेहरू तारांगण कला दालन येथे आयोजिण्यात आले आहे. प्रदर्शनातील सहभागी चित्रकार सुमन दाभोलकर यांनी कोकणातील नयनरम्य वातावरण त्यांच्या विशिष्ट नजरेतून टिपले आहे. त्यांची विशिष्ट शैली असलेली जलरंगातील चित्रे ,शिवाय विलक्षण असलेली अनोखी 'स्टोन आर्ट' साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.त्या स्टोन आर्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, शरद पवार, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर ,बाबासाहेब पुरंदरे ,सिंधुताई सपकाळ , राज ठाकरे , नागराज मंजुळे ,कपिल देव ,नाना पाटेकर आदी दिग्गज व्यक्तीमत्वांचे स्टोन आर्ट आपणांस पाहायला मिळतील.
 
 
हे प्रदर्शन वरळी येथील नेहरु कला दालन येथे दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत कला रसिकांसाठी खुले राहील.  २९ तारीखला संध्याकाळी ६ वाजता कार्यक्रमाचा उद्धाटन सोहळा पार पडला. प्रख्यात चित्रकार अनिल नाईक ,क्युरेटर वर्षा कराळे,प्रदीप पालव ,चित्रकार जितेंद्र गायकवाड, प्रशांत वेदक , वरिष्ठ चित्रकार विजय भोळे ,अभिनेता गंधर्व गुळवेलकर इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0