कोकण रेल्वे आता विजेवरच धावणार, विद्युतीकरण पूर्ण

31 Mar 2022 09:52:09

kokan railway
 
 
मुंबई: कोकणच्या विकासाची गंगोत्री ठरलेली कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवरच धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून त्याची सुरक्षा आयुक्तांकडून चाचणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोकणची प्रदूषणकारी डिझेल इंजिनापासून मुक्तता झाली आहे. "हे विद्युतीकरण कोकणच्या शाश्वत विकासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे" अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विरवरील संदेशात म्हटले आहे. कोकणच्या विकसात कोकण रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोकणचा विकासाला गती देण्यासाठी हे विद्युतीकरण फायदेशीर ठरणार आहे.
 
 
 
 
                                     
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0