अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची निवड

30 Mar 2022 11:30:18

prvin davane
 
मुंबई , दि. २८ (प्रतिनिधी): रविवार, दि. २७ मार्च रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी प्रा. प्रवीण दवणे यांचे नाव सुचवले व संघटनमंत्री सुनील वारे यांनी प्रा. प्रवीण दवणे यांच्या नावास अनुमोदन दिल्यावर उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली. अखिल भारतीय साहित्य परिषद १९६६ पासून साहित्य क्षेत्रात, राष्ट्रीय विचार घेऊन सर्व भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे.
 
 
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील कामाला दवणे यांंच्या नेतृत्वामुळे साहित्यिक उंची प्राप्त होऊन सर्व जिल्ह्यातील कामे नव्याने गती घेईल. याच बैठकीत प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांची कार्याध्यक्षपदी, तर नितीन केळकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, तर सुनील वारे यांच्याकडे प्रदेश संघटनमंत्री अशी जबाबदारी असेल. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांंच्या नियुक्त्या या पुढील एका वर्षासाठी असतील. अखिल भारतीय साहित्य परिषद ही अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी कार्यरत आहे.
 
Powered By Sangraha 9.0