संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने घेतली मोदींची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2022
Total Views |

news



नवी दिल्ली
: संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार, दि. २९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत आभार मानले.


वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले. या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.




@@AUTHORINFO_V1@@