मुंबई : "हिंदूंचे सण म्हटलं की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मरतो? राम भक्तांचा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका का घेतली जाते? याचवेळी जमावबंदीचे आदेश का?'', असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. येत्या महिन्यात गुढीपाडवा आणि रामनवमी असून मुंबई पोलिसांकडून ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या संदर्भात शेलार पत्रकारपरिषदेत बोलत होते. गुढीपाडवा आणि राम नवमी या दोन्ही सणांना कायदेशीररित्या परवानगी देण्याबाबत भाजपकडून सरकारकडे मागणी केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.