नाणार रिफायनरीबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

28 Mar 2022 16:06:34

Aditya Thackeray
 
 
रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान चिपी विमानतळावर दाखल झाल्यावर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, "हा एक वेगळा विषय आहे. स्थलांतरित करण्याचा विषय आहेच पण दुसरीकडे न्यायचा तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावे लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करुन, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल."
 
 
हायवे किंवा कोणताही मोठा प्रकल्प असले तर स्थानिक लोकांना, भुमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो असेही ते म्हणाले. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेण्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, "मतदारसंघ न पाहता जिथे शक्य तिथे जाऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न असतो. मतदारसंघ कुठेही आणि कोणाचाही असला तरी चांगले काम करणे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाने ही प्राथमिकता असते."
 
 
नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेण्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, "मतदारसंघ न पाहता जिथे शक्य तिथे जाऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न असतो. मतदारसंघ कुठेही आणि कोणाचाही असला तरी चांगले काम करणे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे ही प्राथमिकता असते."
 
 
 
Powered By Sangraha 9.0