"अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी आजही कार्यरत" : गोपाळ शेट्टी

26 Mar 2022 20:11:49

Gopal Shetty
 
 
 
मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली पश्चिम पावनधाम इमारतीत केंद्र सरकारच्या पोषण अभियानतंर्गत शुक्रवारी पोषण पंधरवडा साजरा झाला. यावेळी भाजप खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. ‘मी १९९२ साली प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलो. तेव्हापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करून ते सोडवले. आजही मी त्यांच्यासाठी कामात तत्पर आहे, कार्यरत आहे.", असे गोपाळ शेट्टी कार्यक्रमदारम्यान म्हणाले. ३०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय परिश्रमपूर्वक पोषणयुक्त अन्न धान्य, खाद्यान्न पदार्थ प्रदर्शनात मांडले होते. बालविकास प्रकल्प अधिकारी मीनाक्षी बिराजदार यांनी यावेळी प्रस्तावना मांडली आणि पोषण प्रतिज्ञा घेतली.
 
 
 
आयोजित कार्यक्रमदारम्यान गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते गरजू मुलांना पोषण आहार आणि काही भेटवस्तूही देण्यात आल्या. कुपोषित बालकांना काही कमी पडल्यास स्वतः जातीने लक्ष घालून मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी अब्दुल चौधरी, मीनाक्षी बिराजदार, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, डॉ.सपना शाह, पोषक आहार तज्ज्ञ डॉ. रेश्मा सिधे , माजी नगरसेविका बिना दोशी, आसावरी पाटील, अंजली खेडकर, हरीश छेडा, प्रियांका मोरे, जिल्हा सरचिटणीस दिलिप पंडित, प्रसिद्धी प्रमुख नीला सोनी राठोड आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. भाजप नेते डॉ.योगेश दुबे आणि डॉ. नीलू जैन यांचे विशेष प्रयत्न या कार्यक्रमास लाभले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0