आमदार सरनाईकांना ईडीचा दणका!: ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

25 Mar 2022 13:02:58

Pratap Sarnaik

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटूंबियांच्या ११.३५ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. 'एनएसईएल' घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील दोन फ्लॅट्स आणि टिटवाळ्यातील दोन भूखंड घोटाळ्यांप्रकरणी संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती आता ३२५४ कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे हा मोठा घोटाळा मानला जात आहे. एनएससीएल कंपनीत तब्बल ५६०० कोटींहून अधिकची गुंतवणूक असलेला हा घोटाळा मानला जातो.



यात एकूण १३ हजारांहून अधिक गुंतवणूकदार होते. ईडीच्या कारवाईत मोठे घबाड सापडल्याने संपूर्ण राजकीय वर्तूळातील मोठी खळबळ माजली आहे. सरनाईक यांच्यासह एकूण २५ डिफॉल्टरांवरही कारवाई होणार आहे. या सर्वांच्या मालमत्तेवर ईडी टाच आणण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांच्या पुत्रांच्या नावे सुरू असणाऱ्या विहंग कंपनीत अपहार झाल्याचा आरोप ईडीचा आरोप आहे.




Powered By Sangraha 9.0