मुंबई : गायक सोनू निगम यांना मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या नातेवाईकांकडून धमकी देण्यात येत असल्याची माहिती आ अमित साटम यांनी विधानसभेत दिली. तसेच राज्य सरकारने इकबाल चहल आणि त्यांच्या नातेवाईकावर कारवाईची मागणीही केली.
अमित साटम यांनी सभागृहात बोलताना सांगितले, माझ्या मतदार संघातील पद्मश्री पुरस्कार विजेते गायक सोनू निगम यांची अशी तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे नातेवाईक राजिंदर निगम यांना फ्री शो करण्यात यावे यासाठी धमकी देत आहेत. अन्यथा त्यांच्या घरावर नोटीस पाठवून तिकडे तोडक कारवाई करण्यात येईल. याची राज्य सरकारने नोंद घ्यावी. आयुक्त इकबाल सिंह चहल आणि त्यांच्या नातेवाईकावर कारवाई करावी अशी मागणी साटम यांनी केली.