पुणे : पुण्यातील कुख्यात गुंडाने २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच याबद्दल वाच्यता केल्यास व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. याबद्दल भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. राज्य सरकार स्वतःचे खिसे भरण्यासाठी सत्तेत आले आहे का?, असा जाब उमा खापरे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
त्या म्हणाल्या, "हे राज्य सरकार फक्त स्वतःची खिसे भरण्यासाठी सत्येवर आलंय का?, राज्यात काय परिस्थिती आहे जरा याकडे सुद्धा लक्ष असू द्या?, लाज नाही वाटत का, अशी घाणेरडी कृत्य करतांना? पुणे शहरातील एका कुख्यात गुंडाच्या मुलाने २२ वर्षांच्या मुलीवर अनेकदा अत्याचार केला. तसेच पोलिसांकडे गेल्यास तुझे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देत वारंवार तिला ब्लॅकमेल केले... कुठे फेडणार ही पाप? कशी हिंमत होते असं वागायची?."