नवी दिल्ली: हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन गुंजाल यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. गुडगाव येथील त्यांच्या घरावर तसेच ऑफिसवर हे छापे पडले आहेत. मुंजाल यांनी बोगस खर्च दाखवून भरपूर बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या छाप्यांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल २ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या ताळेबंदात अनेक संशयास्पद खर्च आढळून आल्याची माहिती समोर येते आहे.
पवन गुंजाल हे भारतातील पहिल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २४ हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. हिरो कंपनी ही देशातील एक अग्रगण्य वाहन निर्मिती कंपनी आहे. या कंपनीने सध्या इलेकट्रीक वाहनांची निर्मितीसुद्धा केली आहे. जगभरातील सुमारे ४० देशांमध्ये हिरो कंपनीचा व्यापार विस्ताराला आहे.