समतेचा शिलेदार : ‘चवदार तळे विचार मंच’

    23-Mar-2022
Total Views | 93
 

daitva 
 
 
दि. २० मार्च, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिन. पाणी ही निसर्गाची देणगी. त्या पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे. उच्चनीच, जातपात या बेड्या तोडून मानवाने समतेचा वसा जपला आणि जगला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेबांनी या सत्याग्रहातून दाखवून दिले. या दिवशी चवदार तळे येथे ‘चवदार तळे विचार मंचा’च्या कार्यकर्त्यांनी विविध सेवा उपक्रम राबविले! त्याबद्दल काही...
 
दि. २० मार्च, चवदार तळे पाण्याचा सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा मार्ग दाखवला. या स्मृतींनिमित्त दरवर्षी २० मार्च रोजी बाबासाहेबांवर असीम श्रद्धा आणि निष्ठा असणारे हजारो समाजबांधव महाड चवदार तळे येथे मोठ्या संख्येने जमतात. या बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, अन्न-पाणी आणि इतरही सुविधा मिळाव्यात, हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा मानस. त्यामुळेच यादिवशी येथे येणार्‍या समाजबांधवांसाठी काही सुविधा कराव्यात, यासाठी महाड येथील कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित केली. त्यात असे ठरवले की, ‘चवदार तळे विचार मंच’च्या माध्यमातून सेवा उपक्रम राबवायचे. ‘चवदार तळे विचार मंच’ नुसती सेवा उपक्रम राबवणारी यंत्रणा नाही, तर चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना बाबांना जी समता, जी बंधुता आणि जी मानवी न्याय अभिप्रेत होता, त्या समतेचा, बंधुत्वाचा आणि न्यायाचा जागर समाजात सातत्याने करण्यासाठी ‘चवदार तळे विचार मंच’ बांधील आहे.
 
 

daitva
 
 
समाजात आजही अनेक प्रश्न आहेत, जे माणसाच्या जगण्यासंदर्भातले प्रश्न उमटवतात, अशा प्रश्नांना भिडण्याचे बळ बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात होते. त्या बळाचा वारसा ‘चवदार तळे विचार मंच’ला चालवायचा आहे. त्यासाठी समाजबांधवांची उन्नती करणे हे ओघाने आलेच. त्यातलाच एक भाग म्हणजे या वर्षी चवदार तळ्याकडे येणार्‍या समाजबांधवांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे. यानुसार यावर्षी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. तसेच कार्यक्रमाला येणार्‍या बौद्धाचार्य आणि भंतेजी यांच्या निवासाची योजना महाड येथील एका सभागृहात करायचे ठरले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, तसेच इतरही समाजासाठी उपयुक्त असलेली पुस्तके आणि अन्य साहित्य समाजबांधवांना उपलब्ध व्हावेत, यासाठी पुस्तकांचा स्टॉल लावावा, असेही ठरले.
 
 
ठरवल्याप्रमाणे नियोजनही झाले. चवदार तळ्याच्या परिसरात भोजनाचा स्टॉल लावला. या भोजन सुविधेचा लाभ १५०० व्यक्तींनी घेतला. महाड येथील प्रचंड उन्हाचा कडाका असताना स्टॉलवर थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. पुस्तक स्टॉलवरसुद्धा अनेक समाजबांधवांनी भेट दिली आणि पुस्तके विकत घेतली. पुस्तक स्टॉलला महाथेरो राहुल बोधीजी यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि काही पुस्तके विकत घेतली. अनेक स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते या सर्वांनी ‘चवदार तळे विचार मंचा’नी केलेल्या या-या सेवाकार्यात आपला सहभाग दिला. पुढील वर्षी या कार्यक्रमात आणखीन काही सुविधा देण्याचा मानस अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. तसेच या कार्यक्रमात जास्तीत जास्त महाडवासीयांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न पुढील वर्षी कसा करता येईल, याचा विचार करण्याचे निश्चित केले.
 
 
 
daitva
 
 
पूजनीय बाबासाहेबांनी चवदार तळे येथे सत्याग्रह करुन समाजातील अस्पृशता आणि विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला होता. महाड नगर परिषदेने त्याला सकारात्मक विचार करून पूजनीय बाबासाहेबांना सन्मानाने निमंत्रण देऊन ही अस्पृश्यता आणि विषमता दूर करण्याच्या दृष्टीने एक चांगले काम केले. समाजातील एक कुरिती नष्ट करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. ‘चवदार तळे विचार मंचा’तर्फे भविष्यात समाजातील थोड्या का होईना, पण असलेल्या कुरिती, अस्पृश्यता आणि विषमता दूर करून समाजात समरसता निर्माण व्हावी. तसेच समरस वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न स्वयंसेवक आणि कार्यकर्ते करणार आहेत.’चवदार तळे विचार मंच’ ही संकल्पना वास्तवात आणेल हे नक्की!
 
 
- अरूण गायकवाड
 
अग्रलेख
जरुर वाचा
शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121