मलिकांच्या गोवावाला कम्पाऊंडमध्ये ईडीची छापेमारी!

22 Mar 2022 13:05:34

Nawab Malik
 
 
 
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील एलबीएस रोडवर असणाऱ्या गोवावाला कम्पाऊंडमध्ये ईडीच्या पथकाकडून मंगळवारी (दि. २२ मार्च) छापेमारी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही याठिकाणी दाखल झाले आहेत. मुंबई, ठाणेसह अनेक ठिकाणी ईडी छापे टाकण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पँडोरा पेपर्स प्रकरणी एक मोठा बिल्डर ईडीच्या रडारवर असून त्याचे राजकीय संबंधही ईडीकडून तपासण्यात येणारअसल्याचे उघड झाले आहे. नवाब मलिक यांना कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड प्रॉपर्टी संदर्भात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0