एसटीत आता ११ हजार कंत्राटी चालकभरती

20 Mar 2022 17:03:16

st strike
 
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल विरोधात गेल्यानंतरसुद्धा संपकरी एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने एसटीत आता कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटण्याची शक्यता दिसत नाही. या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी तसेच एसटी सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे.
 
 
एसटी महामंडळात सध्या एकूण ८१ हजार ६८३ कर्मचारी आहेत त्यातील फक्त ३१ हजार २३४ कामावर येत आहेत. मोठ्या प्रमाणावर चालक- वाहक या संपात सामील आहेत. या कंत्राटी चालकांकडे चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या देण्यात येतील. येत्या १५ ते २० दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण काण्यात येईल असे महामंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0