यंदा पालिकेच्या आशीर्वादाने मुंबईची तुंबई?

20 Mar 2022 18:38:58

drainage  
 
 
 
 
मुंबई: मार्च महिन्याचे १५ दिवस उलटले आहेत तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील नालेसफाई अजून सुरु झालेली नाही. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून मुंबईत नालेसफाई सुरु करण्यात येते.पण यावर्षी अजूनही या कामांना सुरुवात न झाल्याने पालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी नालेसफाईचे दावे फोल ठरून मुंबईची तुंबाई होतच असली तरी यंदा ती प्रशासनाच्या आशीर्वादाने असणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. पालिका दरवर्षी तब्ब्ल १४५ कोटी फक्त नालेसफाईवरच खर्च करते पण यंदा ही तरतूद सुद्धा केली गेलेली नाही.
 
 
 
"नालेसफाई वेळेवर झाली नाही तर मुंबईकरांवर संकट कोसळलेल. सातपैकी एकाच परिमंडळात आतापर्यंत नालेसफाईचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मार्च नंतर नालेसफाई पूर्ण न झाल्यास मुंबईकरांचे हाल होतील" अशी संतप्त प्रतिक्रिया स्थायी समितीचे माजी सदस्य आणि भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे. पालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली असून आता प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इकबालसिंह चहल काम पाहत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0