The Kashmir Files - कोण होता राजा ललितादित्य ?

    14-Mar-2022
Total Views |
 
 
lalitaditya
 
 
"द काश्मीर फाईल्स" या चित्रपटामध्ये आपण "राजा ललितादित्य" यांचं नाव तर ऐकलंच आहे. पण राजा ललितादित्य कोण होते ? काश्मीरमध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी का आहे ? याची माहिती आज आपण जाणून घेऊया.
 
 
इसवी सन ७२४ - ७६१ मध्ये ललितादित्य मुक्तपीड हा काश्मीरच्या कारकोट घराण्यातील हिंदू कायस्थ सम्राट होऊन गेला. त्याच्या काळात काश्मीरचा विस्तार मध्य आशिया आणि बंगालपर्यंत झाला होता. त्याने अरबस्तानातील मुस्लिम आक्रमकांना यशस्वीपणे दडपून टाकले आणि तिबेटी सैन्यालाही माघार घेण्यास प्रवृत्त केले होते. त्याचे राज्य पूर्वेला बंगाल, दक्षिणेला कोकण, पश्चिमेला तुर्कस्तान आणि ईशान्येला तिबेटपर्यंत पसरले होते.
 
कवी कल्हण यांच्या "राजतरंगिणी" मध्ये राजा ललितादित्य यांच्याविषयीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. याशिवाय "फतेहनामा सिंध" आणि अल बेरूनी यांच्या "tarikh - I - hind" या पुस्तकांमध्येही ललितादित्य यांच्या शौर्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ललितादित्य यांची ख्याती हि चीन पर्यंत पसरली असल्याची शक्यता आहे. कारण चीन च्या "tang" वंशाचा उल्लेख असणाऱ्या "xing tang shu" या पुस्तकामध्येही राजा ललितादित्यांचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. ललितादित्य हे कारकोट या घराण्यातील असून दुर्लभवर्धन हे या घराण्याचे संस्थापक आहेत. दुर्लभवर्धन हे गोंदाडिया घराण्याचा शेवटचा राजा बलदित्य याच्या राज्यात एक अधिकारी होता. बालदित्यने आपली मुलगी अनंगलेखाचा विवाह दुर्लभवर्धनसोबत केला होता. सम्राट ललितादित्य यांना मुक्तपीड या नावानेही ओळखले जाते. वज्रदित्य आणि उदयादित्य हे दोन ललितादित्य यांचे जेष्ठ भाऊ होते.
 
पहिल्यापासूनच ललितादित्य हे पराक्रमी होते. आपल्या राज्याचा विस्तार करणे हे एकच उद्धिष्ट त्यांचे होते. ललितादित्य हे अनेक महिने आणि वर्ष न थकता कोणतही युद्ध लढण्याइतपत पराक्रमी होते. विक्रमादित्य यांनी युद्धात तुर्कमेनिस्तान, बालिस्तान, तिबेट, दारीस इत्यादी आक्रमणकारींचा पराभव केला होता. प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मुजुमदार यांच्या "प्राचीन भारत" या पुस्तकानुसार राजा ललितादित्य यांना पुश्यभूती वंशाचे यशोवर्मन यांनी सर्वात पाहिलं युद्ध आवाहन दिले होते. त्यांनतर ललितादित्य यांनी यशोवर्मन यांच्या अंतर्वेदी या राज्यावर आक्रमण केले आणि युद्धानंतर शांतिबैठकीसाठी यशोवर्मनला तयार केले. त्यावेळी अंतर्वेदी या राज्याची राजधानी हि कान्यकुब्ज होती जिला आज आपण कनौज म्हणून ओळखतो. एवढंच नाही तर अनेक लोक कथांनुसार मेवाडचे वीर योद्धा बाप्पा रावल आणि ललितादित्य यांच्यात घनिष्ठ मैत्री होती आणि दोघांनी मिळून अनेक परकीय अक्रमांकाऱ्यांचा पराभव देखील केला आहे.
 
अरब आक्रमणकारीचे एकच ध्येय त्यावेळी होते ते म्हणजे भारताला संपूर्णपणे एक इस्लामिक देश बनवणे आणि त्याच वेळी मुहम्मद बिन कासीमने मुल्तानवर हल्ला केला होता. अरब आणि तिब्बत आक्रमणकारींवर विजय मिळवण्यासाठी ललितादित्य यांनी चीनच्या tang राजघराण्यासोबत हाथ मिळवणी केली आणि या दोघांनी ,मिळून तिब्बत आक्रमणकाऱ्याना हरवले आणि त्यासोबतच तत्कालीन बांगलादेश आणि अन्य काही जागांवर आपले नियंत्रण त्यांनी मिळवले. त्यांनी त्यावेळी उझबेकिस्तान, तजिकिस्तान, दक्षिण किर्गिझस्तान आणि दक्षिण कझाकिस्तानवरही विजय मिळवला होता. त्यांनतर काबूलमार्गे त्यांनी तुर्कीस्तानवर हल्ला कारण मोमीन बुकाराचा पराभव केला आणि ललितादित्य यांनी आपल्या राज्याची सीमा हि कॅस्पियन समुद्राच्या सीमेपर्यंत विस्तारित केली जी कालांतराने काराकोरम पर्वत शृंखलापर्यंत पोहचली होती.
 
त्याच्या सदतीस वर्षांच्या कारकिर्दीला त्याच्या यशस्वी लष्करी मोहिमा, कलेवरचे अद्भूत प्रेम आणि जगविजेता बनण्याची त्याची इच्छा यामुळे ओळखले जाते. अथकपणे सतत लढायांमध्ये गुंतणे आणि आपल्या अद्वितीय लष्करी पराक्रमाने रणांगण जिंकणे हे त्याच्या स्वभावाचे प्रकटीकरण आहे. ललितादित्य पेकिंग जिंकून १२ वर्षांनी काश्मीरला परतला. त्यावेळी काश्मीर हे सर्वात शक्तिशाली राज्य होते. उत्तरेला तिबेटपासून द्वारका आणि ओरिसा आणि दक्षिणेला सागरी किनारा, पूर्वेला बंगाल, पश्चिमेला विदिशा आणि मध्य आशियामध्ये प्रकरसेन शहरासह काश्मीर राज्याचा विस्तार केला. ललितादित्याच्या सैन्याची पावले आरण्यक (इराण) पर्यंत पोहोचली होती. ललितादित्य यांनी मार्तंड सूर्यमंदिर सारख्या एका उत्कृष्ट मंदिराची स्थापना केली. कालांतराने सिकंदर बुतशिकनने या मंदिरावर आक्रमण करून त्याची नासधूस केली. मात्र आजही या मंदिराला पहिले असता आपण कल्पना करू शकतो कि त्यावेळी हे मंदिर किती भव्य आणि सुंदर होत असेल.
 
हे आपलं दुर्भाग्य आहे कि ज्या राज्याने परकीय आक्रमणांपासून आपल्या देशाचे रक्षण केले त्या राज्याविषयी आपल्याला harman goetz सारख्या विदेशी इतिहासकारकडून माहितीची शहानिशा करावी लागते आहे. त्याही पेक्षा आपलं दुर्भाग्य हे आहे कि ज्या काश्मीर राज्याची सीमा हि मध्य आशियापासून कॅस्पियन समुद्रापर्यंत आणि करकोरमपर्यंत पसरलेली होती तेच काश्मीर राज्य आता आतंकवादाच्या विळख्यात सापडले आहे. ज्या हिंदू राजामुळे काश्मीर राज्याचा इतिहास हा सोनेरी अक्षरात लिहिला जातो, अनेक प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ज्या राजाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो त्याच राज्यामध्ये आज काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या घरी जाण्यासही मिळत नाहीये.
 
- शेफाली ढवण