देबाशिष पांडा बनले इर्डाचे नवीन प्रमुख

14 Mar 2022 13:13:07

debashish panda
 
नवी दिल्ली: केंद्रीय आर्थिक सेवा सचिव देबाशिष पांडा यांची केंद्र सरकारने आता भारतीय विमा नियामक प्राधिकरणच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. देबाशिष यांची नियुक्ती होण्याआधी सुमारे नऊ महिने हे पद रिक्तच होते. देशातील विमा व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी तसेच या क्षेत्राच्या नियमनासाठी भारतीय विमा नियामक प्राधिकरण काम करते.
 
 
                     
 
 
 
 
देबाशिष पांडा १९८७ च्या बॅचचे उत्तरप्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. आर्थिक सेवा सचिव पदावरून जानेवारी महिन्यातच ते निवृत्त झाले होते. आता ते इर्डाचे माजी सचिव सुभाष खुंटीया यांची जागा घेतील. इर्डाच्या प्रमुखपदाचा हा काळ तीन वर्षांचा आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0