बिग बाजार बनणार 'स्मार्ट बाजार'

14 Mar 2022 16:43:21
  
smart bajar
 
मुंबई: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ने फ्युचर ग्रुपच्या 'बिग बाजार' या ब्रॅण्डचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सच्या 'रिलायन्स रिटेल या नव्या कंपनीकडून हा ताबा घेतला जाणार आहे. याच व्यवहारादरम्यान बिग बाजारचे नाव बदलून आता 'स्मार्ट बाजार' केले जाणार आहे. रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठ्या ब्रॅंड्सपैकी बिग बाजार हा एक ब्रँड होता. पण आता हे नाव इतिहासजमा होणार आहे.
 
 
रिलायन्स ग्रुपने ताब्यात घेतलेल्या ९५० स्टोर्स पैकी १०० स्टोर्स ही स्मार्ट बाजार या नावाने सुरु होणार आहेत. पण या बाबतीतली अधीकृत घोषणा रिलायन्स कंपनीकडून अद्याप करण्यात आलेली नाही. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप यांच्या २४ हजार ७१३ कोटींचा व्यवहार होऊन वर्ष उलटून गेले असले तरी अमेझॉन सोबतच्या न्यायालयीन लढाईमुळे हा व्यवहार अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या निकालाची वाट न बघता रिलायन्सने बाग बाजरीचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0