सुजन पिळणकर यांची सुवर्णपदकाला गवसणी

14 Mar 2022 11:54:40

sujan
 
मुंबई : गेल्या वर्षी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदकाची कमाई करणारे मुंबईकर शरीरसौष्ठवपटू सुजन पिळणकर यांनी रविवार, दि. १३ मार्च रोजी ‘११ व्या फेडरेशन कप २०२२’ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
 
‘बॉडीबिल्डर्स असोसिएशन ऑफ सिक्कीम’ यांच्यावतीने मनन केंद्र, गंगटोक येथे ‘११ व्या फेडरेशन कप २०२२’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मुंबईकर शरीरसौष्ठवपटू सुजन पिळणकर यांची निवड झाली होती.
 
रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेच्या ९० किलो वजनी गटात त्यांनी सुवर्णपदकाची कमाई करण्यात यश मिळविले. तसेच सुजन या एकंदरीत स्पर्धेचे ‘फर्स्ट रनर अप’ राहिले. त्यांच्या या यशाबद्दल सुजन पिळणकर यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0