हे सरकार दाऊदचे सरकार आहे का? - नितेश राणे यांचा घणाघात

    13-Mar-2022
Total Views |
 
               
nitesh rane
 
 
 
मुंबई: "दाऊदला मदत करणाऱ्याला पाठीशी घालणारे हे महविकास आघाडी सरकार दाऊदचे सरकार आहे का?" असा घणाघाती सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अनिल देशमुखांचा तडकाफडकी राजीनाव घेणारे, आता सर्व पुरावे नवाब मालिकांच्या विरोधात असतानादेखील त्यांचा राजीनामा का घेत नाहीत? दाऊदचा एवढा पुळका जर आला असेल तर आता मंत्र्यांनी आपल्या केबिन मध्ये महात्मा गांधींचा फोटो काढून दाऊदचेच फोटो लावावेत, दाऊदलाच महाराष्ट्रभूषण द्यावे अशी बोचरी टीका नितेश यांनी केली.