उत्तरप्रदेश निकालांनी संजय राऊतांना फोडला घाम

10 Mar 2022 11:44:17
   
sanjay raut
 
 
मुंबई: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकणांचे निकाल येत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्ता राखणार हे आता स्पष्टच होते आहे. या निकालांनी सर्वच भाजप विरोधकांना घाम फोडल्याचे दिसून आले आहे, यातही शिवसेना नेते संजय राऊत पिछाडीवर नाहीत. "योगी पुढे जाणार हे नक्की होते" असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. योगी तसेच भाजपवर येथेच्छ तोंडसुख घेतल्यावर आता योगींचेच कौतुक करायची वेळ शिवसेनेवर आली आहे. अखिलेश यादव यांनीही चांगली कामगिरी केली आहे असे बोलून राऊत यांनी वेळ मारून नेली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0