युक्रेनहून सुटकेसाठी पाकिस्तानी करतायतं 'भारत माता की जय'च्या घोषणा

    01-Mar-2022
Total Views |
pakisthan





कराची -
युक्रेनमध्ये शिकणाऱ्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परतण्यासाठी भारतीय ध्वज आणि 'भारत माता की जय'चा आधार घ्यावा लागत आहे. रशियन सैन्याने भारतीयांचे नुकसान होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी विद्यार्थी तिरंगा ध्वजाचा वापर करुन आपला जीव वाचवत आहे. यासंदर्भातील दावा करणारा पाकिस्तानी माध्यमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाकिस्तानी न्यूज अँकरला सांगत आहे की, युक्रेनमधून जिवंत सुटण्यासाठी आपल्या देशातील विद्यार्थ्यांना भारतीय ध्वजाचा वापर करावा लागतो आहे. इम्रान खान यांचे सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही पावले उचलत नसल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. हिंदुस्तान स्पेशल नावाचे यूट्यूब चॅनल आहे. यावर २७ फेब्रुवारीला एक व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. यामध्ये एका व्यक्तीने युक्रेनमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा कसा उंचावला आणि 'भारत माता की जय'चा नारा लावला आणि दुसऱ्या देशात सुखरूप प्रवेश कसा केला याचा खुलासा केला आहे.

आरोप करणारी व्यक्ती असे सांगताना ऐकू येते की, पाकिस्तान सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना अल्लाहच्या मर्जीवर सोडले आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलले असून, त्यांनी आश्वासन दिले आहे की भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. याशिवाय पीएम मोदींनी युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशांच्या प्रमुखांशीही संवाद साधला आहे. भारतीयांना कोणतीही अडचण न येता प्रवेश दिला जाईल, असे आश्वासन सर्वांकडून घेतले. यानंतर भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी त्यांच्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावण्याचा सल्ला दिला आहे.
या सर्व परिस्थितीत पाकिस्तान सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करत नाही. यूट्यूब चॅनल हिंदुस्तान स्पेशलनुसार, या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना वाहने भाड्याने घेणे, वाहनांवर भारतीय झेंडे चिकटवणे आणि भारतीय असल्याचे भासवत 'भारत माता की जय' म्हणण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हिंदुस्तान स्पेशल या यूट्यूब चॅनलनेही युक्रेनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी दाखवले. हे विद्यार्थी अन्न-पाण्याशिवाय तिथे अडकले आहेत आणि पाकिस्तानी दूतावासातून कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही, असे सांगत आहेत. पाकिस्तान सरकारवर टीका करणारा एक विद्यार्थी म्हणतो, "दूतावास खोटे बोलत आहे की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. सर्व देश आपल्या लोकांना बाहेर काढत आहेत, पण पाकिस्तानला त्याची पर्वा नाही.