वरळी किल्ला संवर्धनासाठी ६३ लाख ४९ हजार!

पुढील ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची होणार नियुक्ती

    01-Mar-2022
Total Views |

Worli fort
 
 
मुंबई : मुंबईची महापालिका निवडणूक जवळ येत असताना मुंबई पालिकेने अनेक कामी हाती घेतली आहेत. यातील एक काम म्हणजे मुंबईतील किल्ल्यांच्या डागडुजीचे. नुकतेच वरळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६३ ४९ हजार खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी किल्ल्याची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठीचा आराखडा हा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता.
 
 
यानंतर जी दक्षिण विभागाने आराखडा तयार करून निविदा मागवली होती. यानुसार पुढच्या सहा महिन्यांसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. वरळी किल्ल्याच्या डागडुजीसाठी 'देवांग कंस्ट्रक्शन' या कंपनीला ६३ लाख ४९ हजार रुपये दिले जाणार आहेत. किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या नियंत्रणात येत असल्याने त्यांचे ना-हरकत प्राप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील इतर किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी मुंबई प्रशासन काय पाऊले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.