'हिजाब' वादाचे मुंबईत पडसाद

मदनपुरा येथे सह्यांची मोहीम

    09-Feb-2022
Total Views |

madanpura
 
 
 
मुंबई: कर्नाटकात सुरु असलेलं हिजाब प्रकरण रोज चिघळतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत मदनपुरा येथे हिजाबला समर्थन देण्यासाठी सह्यांची मोहीम चालवण्यात आली. परिस्थिती चिघळल्याने कर्नाटक सरकारने तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
"ही आजची मोहीम कर्नाटकातल्या मुस्लिम महिलांना समर्थन देण्यासाठी आहे. संविधानाने आम्हांला हिजाब घालण्याचा अधिकार दिला आहे. यावर निष्कारण वाद तयार झाल्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत" समाजवादी पक्षाचे दक्षिण मुंबई क्षेत्र प्रमुख सोहेल खान म्हणाले. हिजाबच्या समर्थनार्थ मंगळवारी मदनपुरा येथे ५०० हुन अधिक सह्या गोळ्या करण्यात आल्या.